२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हा उत्सव देशभर केला जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून खास मान्यवर आमंत्रित केले आहेत. महाराष्ट्रा मधून सुद्धा अनेक मान्यवरांना आमंत्रित केले आहेत. पण एक नाव असे आहे कि ज्यांना बीजमता म्हणून ओळखले जाते.
हा तुम्ही बरोबर ओळखले असेल, “बीजमाता राहीबाई पोपेरे”. त्याचे कार्य आणि जैविक कृषी क्षेत्रातील योगदानाला पदमश्री पुरस्काराने सन्मान मिळालेले असून पूर्ण जगभर त्यांचे नाव पोहचले आहे.
राहीबाई एक गरीब आदिवासी आणि अशिक्षित आहेत. महाराष्ट्रतील अहमदनगर जिल्यातल्यात कोंभाळणे या गावात राहीबाई राहतात.
“शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येऊ देत व देशवासीयांचे ताट विषमुक्त होऊ दे!” अशी प्रार्थना समस्त शेतकरी परिवारांसाठी प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करणार आहेत.